अन्यायाचे निखारे झेलणाऱ्या ‘ती’ला संबोधून…

तू माऊली आहेस, तू भगिनी आहेस,हक्काच्या नात्याची अर्धांगिनी आहेस… धमक आहे तुझ्यात, तशी रागिणी तू आहेस,तीच नकोशी झालीये इथे, कारण फक्त तू स्त्री आहेस… दानवी पुरुषार्थ इथला, रावणाहूनही अघोरी आहे,बोथट काळीज घेऊन बसला, तरी तू मात्र सहनशील आहेस… तुझा स्पर्श त्याचा हव्यास होता, तुझी हाक नकोशी,विनाशी भूक त्याची, तो मत्सर झेलणारी तू आहेस… भुरळ घालतो […]

Read More अन्यायाचे निखारे झेलणाऱ्या ‘ती’ला संबोधून…

सुजलाम् सुफलाम् राष्ट्र इथले…

सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् ।सस्य शामलाम् मातरम् ।।यावर्षीचा स्वातंत्र्यदिन ७३ वर्षे पूर्ण होऊन ७४व्या वर्षात पदार्पण झाल्याचे प्रतीक आणि शुभ औचित्य. इंग्रज सरकार संपुष्टात आले, भारतीय तिरंगा फडकत असताना आपल्या अस्तित्वाचा एक नवा अध्याय १५ ऑगस्ट १९४७ रोजी सुरू झाला. परंतु संघर्ष अजून संपला नव्हता आणि भारत सर्वार्थाने स्वतंत्र व्हायचा बाकीच होता. इंग्रज गेले, पण […]

Read More सुजलाम् सुफलाम् राष्ट्र इथले…

बघ एकदा आभाळाकडे निरखून…

बघ एकदा आभाळाकडे निरखून…,ते शांत आहे, स्थिर आहे आणि विहंगमसुद्धा…बघ एकदा त्या आभाळाच्या छटा…,कापूस पुंजका जरी विखुरला आहे, ते अजून आहे शुभ्रसुद्धा…बघ एकदा आभाळवरची नक्षी…,कधी पशूजनाचे रूप, कधी ईश्वराचे स्वरूप, भेदहीनसुद्धा…बघ एकदा त्या आभाळवरच्या भेगा…,त्याला रुक्ष न करता विखुरतात, असा तो सहिष्णसुद्धा…बघ एकदा त्या आभाळाचे सामर्थ्य…,तळपत्या प्रखर चटक्यांचा वाली, निरवसुद्धा…बघ एकदा त्या आभाळाचा मोह…,क्षणार्धात दिसेनासा […]

Read More बघ एकदा आभाळाकडे निरखून…

त्यात तू नाहीस…

गर्द रान आहे, गर्क सृष्टी आहे, फक्त तू नाहीस…आहेत इथे वन्यपशु, हिरवाईही आहे, त्यात तू नाहीस… झिरपतो प्रकाश अल्लद, समीरही बहरतो, मात्र तू नाहीस…हलकेच पसरता हस्त तरूंनी, सावलीही व्याकुळ होते, त्यात तू नाहीस… घन अंधार करता, चांदवा जरा भासतो, तिथे तूच नाहीस…शुभ्र कवडसे सांडता रानांत, त्यात तू नाहीस… तप्त नाही कोणी, लुप्तही काही नाही, तरीही […]

Read More त्यात तू नाहीस…

बघ काही फरक वाटतोय का…

जरा एकटं राहून पहा,तुलाच तू नव्याने पारख,तुझ्या स्वतःशी ओळख कर,बघ काही फरक वाटतोय का… तुझ्याच पोकळ मनाला बोल,तुझेच शब्द नव्याने गुंतव,नवे अर्थ शोध आणि न्याहाळ,बघ काही फरक वाटतोय का… कोणी अबोल झालं तर शांत राहा,कोणी मित वाटलं की धीर धर,इथेच दिसेल तुला अंतर माणसांतले,बघ काही फरक वाटतोय का… अल्लड बनव स्वतःला आता,कशाला हवाय सारखा मोठेपणा?ओसरत्या […]

Read More बघ काही फरक वाटतोय का…

मुंबईस पत्र…

प्रिय मुंबई,तू लाखोंचं स्वप्न आहेस, तू लाखोंचा आत्मविश्वास आहेस आणि लाखोंची जगण्याची शिदोरीही आहेस. जगाच्या कानाकोपऱ्यांतून माणूस इथे येतो, कारण त्याला माहितीये, इथे प्रत्येकाच्या स्वप्नांना पाठबळ मिळतं, कामाचं आणि पैशाचंसुद्धा… कामातून पैसा येतो आणि पैशातून नवीन स्वप्नं, नवीन आशा बांधण्याची उमेद येते. यामुळेच तू अनेकांची प्रेरणास्रोत आहेस. तुझा इतका दरारा आहे, की इथे स्वतःच्या मालकीचं […]

Read More मुंबईस पत्र…

जिवलग माय मराठी!

तुझ्यावरी माया, तुझीच ही काया, तुजविण बोलणे, आम्हांस कोठे? मधुर वाणी तुझी, गोड अहिराणी तू, तू वऱ्हाडी शान, मराठवाड्यातही तूच… भाषा म्हणोनि नाही, तू आत्मसन्मान खरा, कोंकणी वस्त्रे तुझी, केवढा सागर तू! कोण शुद्ध तुमच्यांत, याला नसे थारा, रांगडा गडीही सांगे, बोल मराठीचे… इतिहासात तू, अध्यात्मात तू, वेदशास्त्रात तू, तू दशदिशांना… तुझे बोल आमची माता, […]

Read More जिवलग माय मराठी!

जीव स्वस्त आणि जगणं महाग!

मुंबई…जन्मभूमी, कर्मभूमी असणाऱ्यांना साहजिकच प्रिय असणारी, परंतु प्रत्येक महाराष्ट्रवासियाशीही एक नाळ जोडणारी ‘मायानगरी’. जिथे जगभरातून करोडो लोक त्यांची स्वप्नांची शिदोरी घेऊन येतात आणि ती पूर्ण करायला इथे अक्षरशः रक्ताचं पाणी एक करतात. इथे जगणाऱ्यांना कुणीही ‘अमुंबईकर’ सलाम करतोच, मग तो गौरवास्पद असेल किंवा उपहासात्मक! राष्ट्राची आर्थिक राजधानी आहेच, पण मराठी अस्मितेचं एक सामर्थ्य आहे ‘मुंबई’… […]

Read More जीव स्वस्त आणि जगणं महाग!

उरूस…तेव्हा आणि आता!

परभणी म्हटलं की त्यात प्रकर्षाने उल्लेख होणाऱ्या काही घटकांपैकी येणारा एक म्हणजे ‘उरूस’… उरूस हा प्रत्येक परभणीकराच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय! या १५ दिवसांत रोज कोणी ना कोणी विचारतोच, ‘उरूसात गेला की नाही?’ कारण जे इथेच लहानाचे मोठे झालेत, त्यांच्या आठवणींच्या ठेव्यात असणारी आणि अजूनही जिवंत असणारी ही एक पर्वणी! आजच मित्रांसोबत जाऊन आलो आणि तिथे […]

Read More उरूस…तेव्हा आणि आता!

अटळ पण अमान्य खेळ!

माणसाला चिरकाल जिवंत नि कुठल्याही भूतकाळात घेऊन जाणारं कोणी असेल तर आठवणी. शिंपल्यात जसा मोती अनादि अनंत असतो, तश्या आपल्या आठवणी आपल्या आयुष्यात असतात. पण यांचा दुर्गुण हा, की या कधीही म्हणजे अनपेक्षित घटकेलादेखील येऊन ठेपतात आणि मग मनाची घालमेल करतात. तेव्हा वाटतं, नको ते अनाठायी विचार करणं नि त्या काळात जाणंही! असंही, पुन्हा ते […]

Read More अटळ पण अमान्य खेळ!