वाट बघतोय…

वाट बघतोय अजूनही, तुझ्या हाकेची अन् एका उत्तराची… ही शांतता अघोरी आहे, पण शेवट गोड होईल, या आशेची… वाट बघतोय, तुझ्या अबोल नि सुरेख मनाशी नातं जमेल, या क्षणाची… सुखद धक्काही चालेल, स्वप्नं रंगवतोय आपल्याच विश्वाची… वाट बघतोय, तू केव्हातरी माझ्या सावलीचा कवडसा होण्याची… आपण सोबत चालताना, माझ्या पाठी भक्कम ‘तू’ असण्याची… वाट बघतोय, आरशात […]

Read More वाट बघतोय…

…आणि नवा सूर्य उगवला!

हुश्श…अशा प्रकारे 2018 चा सूर्य कायमचा अस्ताला जाऊन आज 2019 ची पहिलीवहिली पहाट झाली. खरंतर दरच वर्षी हा निसर्गाचा पायंडा घडत असतो आणि वर्षाखेर कडूगोड आठवणींना आपण उजाळा देत असतो. बहुतांश लोक नवीन वर्ष सुरू होतंय, या मुहूर्तावर काही ना काही संकल्प सोडत असतात (ते कितपत अंमलात आणतात, हा वादाचा विषय आहे). असो, सर्वांच्याच बाबतीत […]

Read More …आणि नवा सूर्य उगवला!

तू नसताना…

अंतरीचा साद माझ्या, तुजपाशी येऊ दे। गीत माझ्या कंठातले, तुझ्या ओठी खेळू दे।। हाक माझी दूरवरची, तुझ्या श्रवणी येऊ दे। देह तिथे नसला तरी, सहवास माझा राहू दे।। अश्रू दुराव्याचे नयनांत तुझ्या ओघळू दे। मीही रिताच आहे, तुझे आभास मजला होऊ दे।। येताक्षणी तुझ्या लाटा, भरती मलाही येऊ दे। वारे कुठूनही आले, तरी लाट मात्र […]

Read More तू नसताना…

बालपण…तेव्हा आणि आता!

वाढत असताना वयापरत्वे, हरवत गेले निरंकार जगणे। विश्वाचे या दर्शन घेता, विसरून गेलो उनाड खेळणे। दिवसदेखील अपुरा पडे, मित्रांसवे हुंदडताना। कुठलेच नसती हेवेदावे, प्रेमच होते खेळताना। शिकताना बऱ्याच गोष्टी, अकलेतही भर पडली। अवखळपणे जगणे आता, मंदपणाची चिन्हं झाली। ‘वेळ’ आता काढावा लागतो, नुसतं बोलणं होण्याकरता। इथे जगण्याची सूत्रेच बदललीत, मोठे होता होता। गुंतून गेल्यासारखे, कधीतरी […]

Read More बालपण…तेव्हा आणि आता!

अव्यक्त संवाद…

बरळत होतो उगाच मी, थांबणे कुठेच माहित नाही, शब्दांचा सडा टाकत असता, तुझे ऐकणे ठाऊक नाही… शब्दांचे सहस्रक घेऊन फुकाचा माज मिरवत होतो, तुझ्या मनाचा ठाव घ्यावा, मला हे सुचलेच नाही… बेभानपणे पुढेच जातोय, खाचखळगे असतील की! कुठलेही भय नाही, अन कुठलेच शम्यही… तुझ्या अबोल असण्याला साथ देत होतो मीही, पण माझी साथ बडबडत होती, […]

Read More अव्यक्त संवाद…