अन्यायाचे निखारे झेलणाऱ्या ‘ती’ला संबोधून…

तू माऊली आहेस, तू भगिनी आहेस,
हक्काच्या नात्याची अर्धांगिनी आहेस…

धमक आहे तुझ्यात, तशी रागिणी तू आहेस,
तीच नकोशी झालीये इथे, कारण फक्त तू स्त्री आहेस…

दानवी पुरुषार्थ इथला, रावणाहूनही अघोरी आहे,
बोथट काळीज घेऊन बसला, तरी तू मात्र सहनशील आहेस…

तुझा स्पर्श त्याचा हव्यास होता, तुझी हाक नकोशी,
विनाशी भूक त्याची, तो मत्सर झेलणारी तू आहेस…

भुरळ घालतो तो निलाजरा, तरीही तू जातेस,
अनभिज्ञ त्याच्या डावांशी तू, त्याची शिकार होतेस…

तू कितीही बोललीस तरी, तो लचके तोडतो आहेच,
भिकार, क्रूर असुराला, तू प्राणहीन आहेस…

त्याची मर्जी होते, तेव्हा तुझाही विनाश करतो,
कलंक पुरुषार्थाचा तो, नरकातही नेतो…

तुझ्या यातनांचा देह, अजूनही जळतो आहे,
सरणाची राख तुझ्या, ताई…आक्रोश करते आहे…

जगताना पुन्हा आता, तुझा न्याय शोधतो आहे,
की तूच निराश होऊन, आम्हा शाप देते आहेस?

अंधारल्या जगात, तुझी काया भयभीत आहे,
हृदय पिळवटून जातंय, आता तू अदृश्य आहेस…

तुझ्या पदराआडून घात होतो, कशी गं सावरतेस,
सहन करत खंबीर बनत, दैवी शक्तीरूप बनतेस…

  • शार्दुल
    ०२ ऑक्टोबर २०२०

Leave a comment