जिवलग माय मराठी!

तुझ्यावरी माया, तुझीच ही काया,

तुजविण बोलणे, आम्हांस कोठे?

मधुर वाणी तुझी, गोड अहिराणी तू,

तू वऱ्हाडी शान, मराठवाड्यातही तूच…

भाषा म्हणोनि नाही, तू आत्मसन्मान खरा,

कोंकणी वस्त्रे तुझी, केवढा सागर तू!

कोण शुद्ध तुमच्यांत, याला नसे थारा,

रांगडा गडीही सांगे, बोल मराठीचे…

इतिहासात तू, अध्यात्मात तू,

वेदशास्त्रात तू, तू दशदिशांना…

तुझे बोल आमची माता, माय मराठी,

शब्द आपले मोतियांचे, विश्व मराठी…

– शार्दुल

२७ फेब्रुवारी २०२०

2 thoughts on “जिवलग माय मराठी!

Leave a comment